कोल्हापूर ता. १८ (प्रतिनिधी) –

देशातील अग्रगण्य साखर खरेदी -विक्री, निविदांसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म ई-बाय शुगरचे सीईओ उप्पल शाह आणि एमडी हेमंत शाह यांचा जागरण ग्रुप रेडीओ सिटीतर्फे यंदाच्या ‘बिजनेस टायटन्स ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात आला. देशातील सर्वात मोठा ऑनलाईन साखर खरेदी विक्री प्लॅटफॉर्म म्हणून ई- बाय शुगर डॉट कॉमची निवड करण्यात आली होती. हा शानदार पुरस्कार वितरण सोहळा दुबई येथे नुकताच पार पडला. –

कोल्हापुरातील ख्यातनाम जे. के. ग्रुपची उपकंपनी असलेल्या ई-बाय शुगर डॉट कॉमचे संस्थापक (फाउंडर ) उप्पल शाह आणि हेमंत शाह यांनी ई-बाय शुगरच्या माध्यमातून देशाच्या साखर उद्योगात अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता पर्यंत साखर खरेदी- विक्रीची ३००० कोटी रुपयापेक्षा अधिक उलाढाल करीत भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन पोर्टल म्हणून नावारूपास आले आहे. उप्पल शाह आणि हेमंत शाह या दोन बंधूनी आपले वडील जितूभाई के. शाह यांच्या उद्यमशीलतेचा वारसा यशस्वीपणे सांभाळला आहे.