सयाजीमध्ये रंगला ‘टाइम्स अचिव्हर्स ऑफ साऊथ महाराष्ट्र २०२०’ सोहळा
शिक्षण, सहकार, कला, क्रीडा आदी क्षेत्रांत चौफेर कय गाजवत दक्षिण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोमवारी करण्यात आला. ‘टाइम्स अचिव्हर्स ऑफ साऊथ महाराष्ट्र २०२० सम्मान सोहळ्याच्या व्यासपीठावर रंगलेल्या कार्यक्रमासाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती व महापौर निलोफर आजरेकर प्रमुख उपस्थित होत्या. स्मृतिचिन्ह देऊन या सर्वांचा सन्मान करण्यात आला. हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार हॉलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्याला दक्षिण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ‘शिक्षण, सहकार यांबरोबरच कला, क्रीडा आणि सुसंस्कृतपणाचे मूळ कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येते. सामाजिक क्रांतीच्या चळवळा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्याला छत्रपती राजर्षी शाहूंच्या विचारांची देणगी लाभली आहे. त्यांच्या परंपरेचे पाइक होऊन जिल्ह्याचा चौफेर विकास घडवण्यासाठी नेहमीच सेवाभावी वृत्ती जोपासू या,’ असा सूर यावेळी व्यक्त झाला.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, दक्षिण महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे सघन आहेत. मात्र समृद्धी असूनही विकास का होत नाही, याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. टाइम्स परिवाराच्यावतीने झालेल्या सन्मानामुळे जबाबदारी सर्वाचीच जबाबदारी वाढली आहे. याची जाणीव ठेवून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सेवाभावी वृत्ती जोपासल्यास सन्मानमूर्ती गोल्टन मॅन ठरतील. राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिलेला आदर्श आणि विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील राहू खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले,’राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कला, क्रीडा शिक्षणाला प्राधान्य दिले. कोल्हापुरी गूळ, चप्पल, मिसळ या वैशिष्ट्यांसोबत शिक्षण, सहकाराचा पाया घातला. शाहूंच्या भूगोची सामाजिक परंपरा पुढे घेऊन जायचे आहे. अंगभूत बुद्धी आणि उद्यमशील असलेल्या सर्वांनी सामुदायिक प्रयत्न केल्यास दक्षिण महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशात होईल. ‘ यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, राजाराम कारखान्याचे मानद कार्यकारी संचालक पी. जी. मेढे, भारत ओसवाल, महेश यादव, संजय डोईजड, सिद्धार्थ शहा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर कुटुंबीयासमवेत उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, मोना देठे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांनी आभार मानले.
यांचा झाला सन्मान
कैलाश मेढे (स्काय लार्क), डॉ. कृष्णात चन्ने (गो कैशलेश इंडिया कंपनी), डॉ. नितीन कदम (दिशा अॅकॅडमी), अरविंद आप्पासाहेब बजाज (शेट रामचंद्र बजाज ग्रुप), डॉ. भारत खराटे (विभागीय संचलाक, चाटे ग्रुप अँड एज्युकेशन), चंद्रकांत काळे (बाई अर्बन बैंक), सुकुमार चौगुले (एसएफसी इन्फ्राकॉन कंपनी), संजय तपकिरे (संजय तपकिरे अँड असोसिएट), पंडी राजू नायडू (हॉटेल रियल हनुमान व्हेज रेस्टो), विद्याताई पोळ (डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल), कांतीलाल चोरडिया (युनिक ग्रुप), अजयसिंह ही देखाई (अजयसिंह ही देसाई बिल्टर अँड डेव्हलपर), नितेंद्र शहा (जैके ग्रुप), प्रवीणसिंह घाटगे (घाटगे डेव्हलपर), प्रसाद कामत (तनिष्क), रियाज नदाफ (ब्राइन ऑटो), साजनदास दुल्हानी (सरस्वती साडी डिपॉर्ट), राजेंद्र शेटे (राजेश सिल्कर कंपनी), प्रसाद जगताप (चेअरमन, प्रसाद जगताप ग्रुप ऑफ कंपनीज), सिद्धार्थ शहा (एसएस कम्युनिकेशन), भरत ओसवात (महेंद्र ज्वेलर्स) व किरण पाटील (चेअरमन अँड व्यवस्थापकीय संचालक, घाटगे अँड पाटील इंडस्ट्रीज), आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव यांच्यावतीने कुटुंबीयांनी तर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिमेड टूबी युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यावतीने कृष्णा वानखडे योनी सन्मान स्वीकारला.