कोल्हापूर साखर कारखानदारांना उत्पादित साखर एनसीडीईएक्स मार्फत विक्री करुन दराती हमी मिळवता येते. त्याद्वारे एनसीडीईएक्स च्या वायदेबाजारात साखरेची विक्री हा कारखानदारांना फायदा मिळण्यास उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन जे. के. एन्टरप्रायजेस चे संचालक उप्पल शहा यांनी केले.

एनसीडीईएक्स व जे. के. एन्टरप्रायजेस यांच्या वतीने साखर वायदेबाजारामधील जागरुकता येणेसाठी कार्यशाळा नुकतीच संपच झाली. खा. कल्लापाण्णा आवाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. कासार, श्री जीतुभाई शहा. श्री. महावीर गाढ, श्री पृथ्वीराज देशमुख व श्री सुरेश देवनानी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

सर्वप्रथम एनसीडीईएक्स चे बीझनेस हेड श्री सुरेश देवनानी यांनी एनसीडीईएक्स चा परीचय दिला व एनसीडीईएक्स चे श्रीकांत अंबारी यांनी एनसीडीईएक्स साखर वायदे बाजार विषयी विस्तृत माहिती दिली.

त्यानंतर जे. के. एन्टरप्राजेस चे संचालक उपल शहा यांनी साखरेचा वायदेबाजार हा व्यापारी व कारखानदार या दोघांसाठी कसा फायदेशीर आहे. कारखानदारांना खुल्या बाजाराच्या भावापेक्षा एनसीडीईएक्स मध्ये साखर विकी करून पोल्यास १०० रु. १५० रु.चा अतिरिक्त फायदा करून घेता येतो व मासिक कोटया मधून ठराविक साखर प्रत्येक महिन्यास एनसीडीईएक्स ला विक्री केल्यास कारखानदारांना नक्कीच फायदेशीर ठरणारआहे.

कारखानदार प्रत्येक महिन्यामध्ये एनसीडीईएक्स घ्या धोरणानुसार ८०,००० क्विंटल साखर डिलेव्हरी देवू शकतात. श्री शहा यांनी म्हटले की, आपण आपला ब्रोकर कोणता ही निवडा परंतु आपल्या ब्रोकरला साखरे विषयी संपूर्ण ज्ञान आणि माहिती असणे आवश्यक आहे. साखर पुन्हा सुरु झाले पासून आज अखेर एनसीडीईएक्स मधील संपूर्ण डिलीव्हरी व्हॅल्युम हा जे. के. च्या माध्यमातून आला आहे. आमच्या कडे कारखानदारांनी एनसीडीईएक्स तर साखर विक्री केल्यास त्यांनी निश्चित रहावे. डिलेव्हरी साठीची संपूर्ण प्रक्रीयेची जबाबदारी आमची आहे. आम्ही आपली साखर एनसीडीईएक्स मध्ये डीलेव्हरी देवून, सॅम्पलिंग व टेस्टींग, डिमेटींग करून आपल्या साखरेची पूर्ण रक्कम एनसीडीईएक्स च्या नियमानुसार आपल्या खातेवर जमा करतो.

बरेच साखर कारखाने सध्या एनसीडीईएक्स मध्ये आमच्या मार्फत काम करतात आणि आपण सर्वांनीही यामध्ये सहभाग घ्यावा व आपल्या कारखान्याच्या साखरेला जास्तीत जास्त दर एनसीडीईएक्स च्या माध्यमातून मिळवून घ्यावा.

श्री उप्पल शहा यांना एनसीडीईएक्स मध्ये खाते कसे उघडावे, कसे ट्रेडिंग करावे, हेजींग ची व्याख्या काय आणि कारखानदारांना त्याचा कसा फायदा करून घेता येतो व डिलीव्हरी देण्यासाठी काय काय खर्च येतो या विषयी अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले.