कोल्हापूर, ता. २८ (प्रतिनिधी) –

साखर कारखान्यांना उत्पादीत साखर एन.सी.डी.ई. एक्स. वर विक्री करून दराची हमी मिळविता येते. त्याद्वारे एन.सी.डी.ई. एक्स. च्या बायदेबाजारात साखरेची विक्री हा कारखानदारांना फायदा मिळण्यास उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन जे. के. एन्टरप्रायजेस चे संचालक उप्पल शहा यांनी केले.

एन.सी.डी. ई. एक्स व जे.के. एन्टरप्रायजेस यांच्यावतीने वायदेबाजारामधील जागरूकतेसाठी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. रेसिडन्सी क्लब येथे झालेल्या या कार्य शाळेत संपूर्ण राज्यभरातून विविध कारखान्याचे चेअरमन संचालक, कार्यकारी संचालक व देशभरातील व्यापारी वर्ग उपस्थित सर्व प्रथम एन.सी.डी.एक्स. चे प्रॉडक्ट हेड श्रीकांत अंबाटी यांनी एन.सी.डी.ई. एक्स. वरील साखर कॉन्ट्रॅक्ट विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जे. के. एन्टरप्रायजेस चे संचालक उप्पल शहा यांनी एन.सी.डी.ई. एक्स. मधील व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग, साखरेची प्रत्यक्षात डिलिव्हरी कार्यपद्धती या विषयी विस्तृत माहिती दिली.

यानंतर एका शंका समाधानाचे सत्र पार पडले.

कार्यक्रमासाठी उपस्थित माजी खास. कल्लाप्पाण्णा आवाडे, पृथ्वीराज देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी कासारसाहेब ड्रको केनचे यु. आर. के. राव यांनी आपले मनोगत मांडले. आभार प्रदर्शन जे. के. एन्टरप्रायजेसचे संचालक हेमंत शहा यांनी केले.

यावेळी जे. के. एन्टरप्रायजेसचे जीतुभाई शहा, महावीरअण्णा गाट, कोल्हापूर साखर व्यापारी संघाचे अध्यक्ष विजयभाई शहा, अमितकुमार गाट, दत्त शिरोळ कारखान्याचे एम.डी. पाटील, वारणा कारखान्याचे एम.डी. श्री. चव्हाण, जवाहरचे एम.डी. श्री. जोशी, एन. सी. डी. ई. एक्स. चे सुरेश देवयानी लीगलहेड हेमलताजी आदी उपस्थित होते.