शनिवार, २२ फेब्रुवारी २०२०
प्रश्न : १० वी नापासमुळे तुमच्या यशस्वी जीवनाला कशी कलाटणी मिळाली. ? उप्पल शहा : शाहुपूरी येथील गुजराती हायस्कूलमध्ये मी शिक्षण घेत होतो. शिक्षणामध्ये माझी म्हणावी तशी प्रगती नसल्याने, दहावीतच नापास झालो. नापास झाल्याने पुन्हा कधीच शाळेची पायरी न चढण्याचा ठाम निर्णय घेतला. शिक्षणाला रामराम ठोकून, वडीलांच्या छोटयाशा साखर व्यवसायात उतरलो. धाडस, दूरदृष्टी व नियोजन याची सांगड घातली. माझे वडील जितेंद्रकुमार शाह हे देखील एका दुकानात नोकरी करत होते. त्यांनी आपली नोकरी सोडून, जितेंद्रकुमार कांतीलाल या मनाल आपल्या नावाने जे.के. एटरप्रायजेस नावाची छोटीसी फर्म सुरू केली. क साखरेचा व्यापार सुरू केला. वडीलांच्या या व्यवसायातच दूरदृष्टी 26 ठेऊन, साखर व्यवसायातूनच जे. के. उद्योगांचा विस्तार केला. साखर व्यवसाय दैनंदीन चढ-उतारीच्या घडामोडीवर अवलंबून असल्याने, यातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे हा नित्यक्रम ठरला होता. या अनुभवातूनच अनेक उद्योगाची साखळी उभी केली. वडिलोपार्जित साखर व्यापाराबरोबर बिल्डींग कॉन्ट्रॅक्टींग, डिजिटल मार्केटींग एजन्सी, टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर्स सोशल मिडिया मार्केटींग, अॅडव्हेंचर
स्पोर्टस्, फिटनेस ट्रेनिंग अॅन्ड इव्हेंटस्,स्टॉक्स कमोडिटी व शेअर ब्रोकींग,वेल्थ प्लॅनिंग अॅन्ड मॅनेजमेंट,लाईफ स्टाईल पोर्टल, व्हाईस अॅन्ड ऑडिओ सोल्युशन या नवीन क्षेत्रात यशस्वीरित्या प्रवेश करून यश प्राप्त सध्या रेग्डियन ग्रुपच्या माध्यमातून जे.के. ग्रुप क्रिडा क्षेत्रात उतरला आहे.
साखर व्यवसायाच्या चीनी मंडीसह इतर व्यवसायाबाबत काय सांगू शकता ?
साखरेच्या दैनंदीन घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी व माहीती देण्यासाठी स्वतःची एक यंत्रणा ‘चिनी मंडी कॉम या नावाने फक्त साखर उद्योगाची माहीती देणारी ही वेबसाईट सुरू केली सध्या इंग्रजी, हिंदी, गुजराथी व मराठी या चार भाषेत सुरू असून, याला जगभरातील युजर्स मिळत आहेत. साखर उद्योग,शेतकरी, व्यापारी व याच्या निगडीत लोकांना ही वेबसाईट उपलब्ध ठरली आहे.त्याच जोडीने आता ‘आवाज कॉम’, भारतातील पहिले हॉटफ्रायडे टॉक कॉम, ही लाईफ स्टाईल वेबपोर्टल जे.के.ग्रुपने सुरू केली.याचबरोबर आग्रहयाह टेक्नॉलॉजी कंपनीची स्थापना करून,यामध्ये गुगल व अॅमेझॉन एलेक्साचे प्रेफड पार्टनर म्हणून काम करत आहोत. ही कंपनी भारतातील पहिली वॉईस एजन्सी आहे. कोणतीही संधी शोधावी लागत नसून ती निर्माण करावी लागते. ही दूरदृष्टी ठेऊनच मी काम करत आहे.
प्रश्न : आपल्या यशाबाबत कोणाला अधिक महत्व देता ?
उप्पल शाह : सर्वसृत अशी एक आख्यायीका आहे, कि प्रत्येक यशश्वी पुरुषा मागे त्याच्या धर्मपत्नीचा हात असतो. माझ्याही पाठी माझी पत्नी व आई यांचा हात आहे. पण त्याही पेक्षा मला आवर्जून सांगावे
लागेल, आज मी जे काही केलेलं आहे, मी जो काही जगासमोर दिसत आहे, त्या पाठीमागे माझे वडील व भाऊ यांचे खूप मोठे योगदान आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलं ज्यावेळी नवीन काही करत असतात त्यावेळी पालकांचा सल्ला असतो कि, अंथरुण पाहून पाय पसरावे, पण माझ्या वडलांनी सांगितले कि पाय पसरले आहेत तर तेवढे मोठे अंवरून तयार करण्याच्या पाठीमागे लाग. तू अपयशी कधीच होणार नाहीस. आणि मग क्षेत्र कोणतेही असो, व्यापार, वाणिज्य, क्रीडा, तंत्रज्ञान त्यांनी मला कधी अडवलं नाही आणि मीही कधी पाठीमागे वळून पहिले नाही. आज आम्ही दोघे भाऊ कितीही मोठे झालो तरी प्रत्येक गोष्ट वडिलांच्या सल्ल्यानेच करत असतो. आमच्यासाठी ते ज्ञानाचे विद्यापीठच आहेत, कारण त्यांचे ज्ञान हे व्यवहारातून आले आहे आणि कितीही मोठ्या विद्यापीठात आम्हाला ते मिळाले नसते जे मला वडिलांकडून मिळाले.
प्रश्न : विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल ?
उप्पल शाह: दहावी किंवा बारावीत नापास होणे, मार्क कमी पडणे यामुळे नाराज होऊन नकोते पाऊले उचलायची गरज नाही. आज काल मुलं लगेचच डिप्रेशनमध्ये जातात किंवा स्वतःचं आयुष्य संपवून घ्यायचा प्रयत्न करतात. नुसत्या पदवी आणि मार्क शीट वर माणूस कधीही यशश्वी होत नसतो, हे ध्यानात ठेवून आत्महत्येचा विचार सुद्धा करू नये. आपण कमी शिक्षणामधूनही बरच काही करू शकतो, प्रत्येक माणसाला देवांने काहीनाकाही तरी एक वेगळा गुण दिलेला असतो. तो आपण शोधून काढला तर आयुष्य खूप सोप होऊन जातं. असे भारता मध्ये व आपल्या समाजामध्ये बरेच उदाहरण आपल्याला बघावयास मिळतात. जर मी दहावीत पास झालो असतो तर कुठे तरी उत्तम ठिकाणी चांगल्या पगारावर काम करत असतो. पण व्यावसायिक शिक्षण, अनुभव व व्यावसायिक ज्ञान शिक्षणापेक्षा अधिक महत्वाचे आहे. त्याच बरोबर आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी ज्यांचे आचार विचार आपल्या आयुष्यामध्ये आणून त्याचे आचरण करू शकता. त्यांची पुस्तके किंवा त्यांचे व्हिडिओ बघून इन्स्पायर होऊ शकता. दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांनी निराश न होता, नवीन संधीचा फाय घेऊन त्या त्या क्षेत्रात आपण यश मिळवू शकता.
प्रश्न: आपले सामाजिक कार्य व मिळालेले पुरस्कार कोणते ? उप्पल शहा : व्यावसायिक जबाबददारी
सांभाळतच सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. जे.के. चॅरिटेबल टस्टव्दारे सामाजिक काम सुरू आहे. पूरग्रस्तांना मदत. गरीब, अनाथ व ज्येष्ठ लोकासाठी दोन वेळचे जेवण घरी पोचवण्याचे काम आपला ट्रस्ट करत आहे. आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मोस्ट सक्सेसफुल बिझनेसमन अॅवार्ड, फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अॅवार्ड, (थायलंड), टॉप इन्फ्लुएन्सर अॅमेझॉन एजन्सी, मॅन ऑफ दि शुगर (यूएसए) कॉन्क्लेव्ह अॅवार्ड, वेब समिट पीच अॅवार्ड (पोर्तुगल,) आऊट स्टूडींग अचिव्हमेंट अॅवार्ड, पॉल हॅरिस फेलो (रोटरी इंटरनॅशनल), यंगेस्ट सरीयल आंतरप्रोवर अॅवॉर्ड हे पुरस्कार माझ्या व जे. के. ग्रुप नावावर आहेत…
शिक्षण, पदवी व यशस्वी व्यवसाय हे त्रिसूत्र कांही लोकांनांच जमत असते. उच्चशिक्षण घेऊन देखील बेकारांची संख्या वाढत आहे.. पण शिक्षणाला काडीमोड देऊन, स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेले लोक हाताच्या बोटावर आहेत. अल्पशिक्षण घेतलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील, मैदानावर धावांचा पाऊस पाडणारे लिटल मास्टर सचीन तेंडूलकर असो नाही तर कोल्हापूरातील उद्योगक्षेत्रात ज्यांचे नाव सातासमुद्राच्या पलिकडे घेतले जाते ते सरोज उद्योग समुहाचे बापू जाधव यांना. लोक विसरलेले नाहीत. शिक्षण कमी मात्र कर्तृत्व मोठे, या रांगेमध्ये जे. के.
ग्रुपचे सर्वेसर्वा ३७ वर्षीय उप्पल शाह यांचे नाव यशस्वी उद्योजक म्हणून घेतले जात आहे. दहावी नापासानंतर शाळेची पायरी न चढण्याची भिष्म प्रतिज्ञा घेतलेले उप्पल आज आपल्या कार्यकतृत्वातून यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा अनुभव त्यांच्याच शब्दात.