लोकनेते सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाइन टेंडरचा प्रारंभ रविवारी सकाळी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हमीदवाडा कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, मार्केटिंग मॅनेजर बागल, जे. के. ग्रुपचे चेअरमन जितूभाई शाह, ई बाय शुगर डॉट कॉमचे संस्थापक आणि सीईओ उप्पल शाह, हेमंत शाह उपस्थित होते. हमीदवाडा कारखान्याचे पहिले ई-टेंडर दुपारी १२ वाजता ‘ई बाय शुगर डॉट कॉम’वर घेण्यात आले.

उप्पल शाह आणि हेमंत शाह यांनी साखर कारखाने व शेतकऱ्यांना फायदा eBuySugar.com द्वारे साखर होण्यासाठी खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला. हा प्लॅटफॉर्म साखर खरेदीदारांना मोफत विमा सुविधाही देतो. साखर खरेदीदारांच्या दुकानापर्यंत साखर सुस्थितीत पोहोचविण्याची तसेच व्यवहार आणि पेमेंटची हमी देते.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, संपूर्ण जग डिजिटलकडे वळत आहे. आम्हीसुद्धा आता डिजिटल साखर विक्री करण्याचे ठरविले आहे. ऑनलाइन टेंडर प्रक्रिया आणल्यामुळे आमची साखर देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणतेही व्यापारी डायरेक्ट खरेदी करू शकतील.

Source: http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HKGR_20230703_2_18