संजय घोडावत ग्रुपच्या स्टार लोकल मार्ट व चाय स्टेशन या कंपनीचा सामंजस्य करार करण्यात आला. त्या करारानुसार चाय स्टेशनच्या स्टार लोकल मार्ट बरोबरच्या पहिल्या आऊटलेटचा शुभारंभ मजले येथील घोडावत पेट्रोल पंपावरील लोकल मार्ट मध्ये घोडावत उद्योग समूहाचे प्रमुख श्री. संजय घोडावत यांचे हस्ते व श्रेणीक घोडावत यांचे उपस्थितीत करणेत आला.
मागील दोन वर्षातील कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक छोटया व्यापाऱ्यांना आपले उद्योग व्यवसाय बंद करावे अथवा बदलावे लागले आहेत. तसेच अनेक तरुण तरुणींना आपल्या नोकरीस मुकावे लागल्याने बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा छोटया व्यापाऱ्यांना व उमद्या तरुणतरुणींना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे करून सक्षम बनवण्याच्या हेतूने लोकल मार्ट व चाय स्टेशन यांनी छोटया उद्योजकांना व बेरोजगारांना व्यवसायची संधी देण्याचे ठरविले आहे. यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले कि लोकल मार्ट व चाय स्टेशनचे भवितंव्य उज्वल असलेने नवयुवकांनी या संधीचा फायदा येवून कमी भांडवलामध्ये आपला स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी पुढे यावे. त्यानुसार आज सौ. क्रांती जोशी यांनी सुरु केलेल्या या स्टेशनच्या आऊटलेटचा शुभारंभ करून संजय घोडावत यांनी त्यांना व्यवसाय शुभारंभच्या व व्यवसाय वृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
चाय स्टेशनच्या आऊरलेटमध्ये विविध प्रकारच्या चहा कॉफीसह तरुण वर्गाला आकर्षित करतील असे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी चाय स्टेशनचे संचालक उप्पल शाह, हेमंत शाह, शैलेश ओसवाल, “वैभव ओसवाल, आकाश मुंढे यांच्यासह लोकल मार्टचे बिझनेस हेड विकास श्रीवास्तव, फायनान्स मॅनेजर अर्पित अग्रवाल यांचेसह यश जोशी, स्वरा जोशी यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत जितूभाई शहा व जयेश ओसवाल यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. क्रांती जोशी यांनी केले.