वार्ताहर मुरगूड

ई-बायशगुरने ऑनलाईन टेंडर प्रक्रिया आणल्यामुळे कारखान्याची साखर देशात कोठूनही कोणतेही व्यापारी थेट खरेदी करू शकतील. यामुळे कारखान्याला चांगला दर मिळेल आणि याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन मंडलिक साखर कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यानी केले.

लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यावर ई- बायशगुर डॉट कॉमतर्फे आयोजित ई-टेडरच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे पहिले ई-टेडर ई – बायशगुर डॉट कॉमवर घेण्यात आले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ई – बायशगुर डॉट कॉमतर्फेचे संस्थापक उप्पल शाह म्हणाले, देशात प्रथमच ऑनलाइन निविदा ई- बायशगुर डॉट कॉमद्वारे होत आहे. त्यामुळे व्यापारी कारखान्यातून थेट साखर खरेदी करतील आणि त्याची रक्कमही थेट कारखान्याच्या खात्यावर जमा होईल. कोल्हापुच्या जेके समूहाची ही उपकंपनी आहे जितुभाई शाह यांनी १९८१ मध्ये स्थापन केलेल्या जेके ग्रुप समूहाने ई-बाय शुगर – ऑनलाइन ट्रेड पोर्टल, चिनीमडी – न्यूज अँड मीडिया हाऊस, अग्रीमंडी – सल्लागार कंपनी, शुगर अँट इथेनॉल अवॉर्ड्स आणि इंटरनॅशनल शुगर अँड इथेनॉल कॉन्फरन्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.

देशातील २८०० हून अधिक वापरकर्ते ई- बायशगुर डॉट कॉमद्वारे ऑनलाइन टेंडरचा लाभ घेऊ शकतील. यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजीराव इंगळे, कार्यकारी संचालक एन. वाय पाटील, मार्केटिंग मैनेजर महेश बागल, जेके ग्रुपचे चेअरमन जितूभाई शाह, उप्पल शाह, हेमंत शाह, ई-बायशगुर डॉट कॉमचे अधिकारी आदी उपस्थित होते.