संघमित्रा चौगले कोल्हापूर
निराधार ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक दुर्बलतेमुळे घरांत स्वयंपाक करणे शक्य होत नाही. त्याशिवाय बाजारातून किराणा, भाजीपाला आणणेही जमत नाही. ही अडचण कोल्हापुरातील जे. के. शाह चॅरिटेबल ट्रस्ट संचलित माँ समोर सेवाधाम या स्वयंसेवी संस्थेने ओळखून गरीब व निराधार ज्येष्ठांना सकाळ संध्याकाळचा डबा घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे
संस्थेचे अध्यक्ष जितूभाई शहा यांनी ही जबाबदारी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वीकारली आहे. स्वरदा रानडे यासाठी जेवण बनविण्याचे काम करतात. जेवण करण्यापासून डबा पोहचविण्याची यंत्रणा उल्का दिवटे यांच्या नियंत्रणाखाली चालते. सध्या सकाळी व संध्याकाळी ५० डबे शहरातील वृध्दांच्या घरी पोहोचविले जातात. ही सेवा २०१६ पासून सुरू आहे.
सकाळी ११ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डबे दिले जातात. ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा विचार करून पालेभाज्या, कडधान्ये आणि चपाती
त्याचबरोबर लोणचे, चटणी, एखादा गोड पदार्थ असा ज्येष्ठांना सोसवेल, पचेल असे जेवण या ट्रस्टतर्फे स्वरदा रानडे बनवतात. जेवणाची चव व डबा वेळेवर पोहोचतो की
नाही यासाठी दर दोन महिन्यांनी सर्व्हे केला जातो. याचा परिणाम म्हणून या तीन वर्षात वेळेत डबा मिळाला नाही अशी एकही तक्रार नाही. याचे नियोजन व व्यवस्था उप्पल शहा व हेमंत शहा पाहतात. तसेच सुनील बोडके व उल्का दिवटे त्यांना मदत करून ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींची माहिती देतात. या भोजन व्यवस्थेत एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला सामावून घेण्यापूर्वी त्याच्याकडून विनंती अर्ज मरून घेतला जातो. तो खरेच निराधार आहे का याची चौकशी केली जाते. त्याचे नाव, पत्ता, घरच्यांसह शेजाऱ्यांचे नाव घेवून अन्य तपशील भरून घेतला जातो. यानंतर निराधार ज्येष्ठ नागरिकांनी डबा सुरू करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी दाभोळकर कॉर्नर येथील अमात्य टॉवरच्या तीसऱ्या मजल्यावर भेट द्यावी. असे जे. के. शहा यांनी कळविले आहे.
ज्येष्ठांना पचेल असे जेवण
गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे जेवणाचा डबा येतो. अगदी वेळेत आणि प्रत्येक ज्येष्ठाला पचेल असे जेवण या डब्यातून मिळते. कोणताही शारीरीक त्रास होत नाही. याचा निराधार ज्येष्ठांनी नक्कीच लाभ घ्यावा.
मानसिंगराव जगताप, ज्येष्ठ नागरिक
निराधारांना आधार द्या

गेल्या तीन वर्षापासून ज्येष्ठांपर्यंत जेवण पोहचविले जाते. यातील ज्येष्ठ लोक जेव्हा जेवणाबद्दल व सेवेबद्दल जी प्रतिक्रीया देतात तेव्हा समाधान वाटते. यातून सांगावे वाटते, आज समाजातील प्रत्येक दानशुर व्यक्तिने | मिळालेल्या उत्पन्नातील एक भाग गरजवंतांसाठी द्यावा. यामुळे कोणीही निराधार राहणार नाही. त्यांच्या पाठीमागे
आपल्यासारख्या हजारोंचा आधार असेल.
– जे. के. शहा, अध्यक्ष जे. के. ट्रस्ट