शाह यांचा जन्म २७ जुलै १९८२ चा. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या व्यवसायाच्या माध्यमातून काम सुरू केले. ज्या व्यवसायात रोजचा चढउतार असतो अशा साखर व्यापाराच्या व्यवसायात उप्पल यांनी एक उद्योजक होण्यासाठीचा श्रीगणेशा केला. निर्णय घेण्यासाठीची दूरदृष्टी निर्णय घेणे, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे या गोष्टी एखाद्या व्यावसाि किंवा उद्योगपतीसाठी खूप गरजेच्या असतात. हे गुण अर्थातच उप्पल शाह यांच्यात आहेत आणि गुणांचे श्रेय ते त्यांचे गुरू आणि वडील जितेंद्रकुमार शाह यांना देतात. जितेंद्रकुमार यांनीही एकेकाळी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. जे. के. एंटरप्रायजेस नावाने एक छोटी फर्म सुरू करत त्यांनी साखरेचा व्यापार सुरू केला. वडिलांच्या या उद्योगशील वृत्तीतून आपल्यातही उद्योगशील गुण आल्याचे उप्पल शाह मानतात. उप्पल शाह यांच्यासाठी वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आहे तसाच पुढे सुरू ठेवणे, हे अधिक सोपे होते. पण,उप्पल यांच्यातील दूरदृष्टी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या व्यवसायाला आधुनिकतेची, तंत्रज्ञानाची झालर देण्याची त्यांची मनीषा होती.या अस्वस्थतेतूनच एक एक गोष्टी घडत गेल्या
आणि जे. के. ग्रुप नावाचा एक उद्योग समूह उभा राहिला. सध्या रगेडियन ग्रुपच्या माध्यमातून जे. के. ग्रुप क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. वडिलोपार्जित शुगर ट्रेडिंग व्यवसायाबरोबरच उप्पल शाह यांनी बिल्डिंग क्टिंग, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर्स, सोशल मीडिया मार्केटिंग, अॅडव्हेंचर स्पोर्टस्, फिटनेस ट्रेनिंग आणि इव्हेंट्स, स्टॉक्स, कमॉडिटी आणि शेअर ब्रोकिंग, वेल्थ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, लाईफस्टाईल पोर्टल, व्हाईस एंड ऑडिओ सोलुशन्स या क्षेत्रात पाय रोवले आहेत.
उप्पल शाह यांची दूरदृष्टी या व्यवसायांना आणखी मोठ्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटतो. काही वर्षात साखरेचा व्यापार हा दैनंदिन घडामोडींवर अवलंबून झाला आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे हे नित्याचेच आहे. या गरजेपोटी उप्पल शाह यांनी साखरेच्या घड़ामोडींवर लक्ष ठेवण्याची स्वतःची यंत्रणा उभारली. त्याच दरम्यान जेके ग्रुपने डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू केली होती. त्यामुळे जर, आपल्याकडे साखरेच्या उद्योगाशी संबंधित इतकी माहिती आहे; तर ती लोकांपर्यंत पोचवायला हवी, या उद्देशाने ChiniMandi.com ही केवळ साखरेच्या घडामोडींच्या बातम्या देणारी वेबसाईट सुरू झाली. सध्या इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि मराठी अशा चार भाषांत ही वेबसाईट चालते आणि जगभरातील देशांमधून या वेबसाईटला युजर्स मिळत आहेत. साखर उद्योग, शेतकरी, व्यापारी आणि त्याच्याशी निगडित प्रत्येक बाब आज या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपण करत असलेल्या व्यवसायातील घडामोडींवर लक्ष ठेवणारे। माध्यमच उपलब्ध करून देणे हा उप्पल शाह यांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना सांगता येईल. त्याच्या जोडीने आता aawaz.com हे भारतातील पहिले हिंदी पॉडकास्ट आणि hotfridaytalks.com हे लाईफ स्टाइल वेबपोर्टल जे. के. ग्रुपने सुरू केले. आहेत. त्याचबरोबर आग्रिया टेक्नॉलॉजी कंपनीची स्थापना केली. ज्यामध्ये कंपनी गुगल आणि अमेझॉन एलेक्साचे प्रेफर्ड पार्टनर म्हणून काम करत आहे आणि ही कंपनी भारतातील पहिली वॉईस एजन्सी आहे. शाह हे व्यक्तिमत्त्व आपल्या ध्येयासाठी सदैव झपाटलेले असते. संधी मिळत नसेल तर ती निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो. अर्थात एखाद्या गोष्टीत खूप मोठे यश मिळवायचे असेल, तर त्यासाठीचा प्रवास मोठा असतो. त्यामुळे या प्रवासात जे काही आपल्या हातात आहे. त्यात आनंद मानून प्रवासाचा आनंद लुटावा असे उप्पल शाह यांचे मत आहे. आजवर मिळवलेल्या यशाचे श्रेय ते आपल्या वडिलांच्या शिकवणुकीला आणि त्यांचे बंधू हेमंत आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या टीमला देतात. यात त्यांच्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे. कोणताही उद्योग किंवा उद्योग समूह चांगल्या टीमशिवाय उभा राहूच शकत नाही, असे उप्पल यांचे मत आहे. एखाद्या कंपनीत काम करणारा कर्मचारी हाच त्या कंपनीचा मालक असतो. त्याची प्रत्येक कृती कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी फायदेशीर ठरत असते. त्यामुळे जेके ग्रुपचा कोणताही कर्मचारी कामगार म्हणून नव्हे, तर एक परिवाराचा हिस्सा म्हणून काम करतो. आज जो काही आहे, तो त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे कोणत्याही उद्योजकाने आपल्या टीमला मोटिव्हेट करणे, अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या बरोबर उभे राहणे व त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे, असा सल्ला उप्पल शाह नवउद्योजकांना देतात.
दहावीचा निकाल टर्निंग पॉइंट
जगात नापास मुलांनी इतिहास घडवल्याची अनेक उदाहरणे आहेत. बिल गेट्स असो किंवा स्टिव्ह जॉब्ज… अनेक कारणांनी त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. उप्पल शाहही त्याच शृंखलेतील आहेत. कोल्हापुरातील गुजराती शाळेत त्यांचे शिक्षण सुरू होते. दहावीची परीक्षा दिली; पण ते नापास झाले. त्यानंतर पुन्हा परीक्षा देण्याची त्यांची इच्छा नव्हती. अखेर त्यांनी वडिलांच्या जेके एंटरप्रायजेस या फर्ममध्ये काम करायला सुरवात केली. वडील जितेंद्रकुमारही आधुनिकतेची, नावीन्याची कास धरणारे असल्याने त्यांनी मुलगा उप्पलला व्यवसायातील बारकावे शिकवण्यास सुरवात केली.
व्यवसाय करताना एखादा निर्णय कसा घ्यावा डोळ्यांसमोर दिसणारा फायदा की भविष्यात होणारं नुकसान, यांतले काय निवडावे, याचे धडे गिरवत गिरवत उप्पल शहा यांनी साखर व्यापारात वडिलांबरोबरच आपलंही नाव केलं. दहावीच नव्हे, तर एखाद्या परीक्षेत नापास झाल्यानंतर किंवा कमी मार्क्स मिळाल्यानंतर हातपाय गाळून बसणारी अनेक मुले आपण पाहतो. त्यांच्यासाठी उप्पल शाह एक उत्तम उदाहरण शिक्षण, शाळेचे प्रमाणपत्र हवंच; पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण वेगळे जग उभे करू शकतो, हेच उप्पल यांनी दाखवून दिलंय, शिक्षण हे घेतलेच पाहिजे पण माझ्या आयुष्यात वडिलांनी व्यवसायात दिलेले शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञान हे खूप मोलाचे ठरले. मी दहावीत नापास झालो नसतो तर कदाचित आज या जागी नसतो. मला या सर्व व्यवसायांत माझा भाऊ हेमंत याची मोठी साथ आहे आणि त्यामुळेच आम्हा दोघांना बाबांची साथ घेऊन जे. के. ग्रुपला या उंचीवर पोचवण्यात यश आले आहे, असं उप्पल सांगतात.
सामाजिक भान
अनेक व्यवसायांची जबाबदारी सांभाळताना उप्पल शाह यांनी सामाजिक भानही जपलंय. जेके चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सध्या ते सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. सध्या कोल्हापुरात दोन वेळचे जेवणाचे डबे घरी पोचवण्याचे काम हा ट्रस्ट करत आहे. अनेक वर्षे सुरू असलेल्या कामाची कोठेही वाच्यता न करण्याचा निर्णय शाह कुटुंबीयांनी घेतला होता; पण या लेखाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ट्रस्टचे हे काम सर्वांना माहिती होत आहे. त्याचबरोबर अनेक गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्चही जेके ट्रस्टच्या माध्यमातून उचलण्यात येत आहे.
उप्पल शाह यांना मिळालेले पुरस्कार:
* महाराष्ट्र गौरव पुरस्कार
* मोस्ट सक्सेसफुल बिजनेसमन अॅवॉर्ड
* फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अॅवॉर्ड, थायलॅण्ड
* टॉप इन्फ्लुएन्सर अमेझॉन एजन्सी (यूएसए) अॅवॉर्ड * मॅन ऑफ दी शुगर कॉन्क्लेव्ह अॅवॉर्ड
* वेब समिट पीच अॅवॉर्ड, पोर्तुगाल
* आउटस्टैंडिंग अँचिव्हमेंट अॅवॉर्ड
* पॉल हॅरिस फेलो (रोटरी इंटरनॅशनल)
अभ्यासात गती नव्हती त्याला, पण नयनी अज्ञाताचा शोध होता. आवड आदर माया माणसांची त्याला, ध्रुवतारा चमकेल हा विश्वास होता. शिक्षकापेक्षा माँ आई होऊन त्याची, आत्मविश्वास त्याचा वाढवला होता. आनंद अभिमान विश्वासाने ऊर भरला, आकाशाला तो गवसणी घालत होता… गवसणी घालत होता..
– सौ. परिणीती शाह-उपळेकर (शिक्षिका, गुजराती हायस्कूल)
कार्यकारी संचालक, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, संपादक, चार्ट, फायनान्शिअल प्लॅनर, फाउंडर, चीफ स्ट्रॅटेजिक प्लॅनर, मार्केटिंग प्लॅनर, सल्लागार, रीसर्च अॅनालिस्ट या पदांवर एकच माणूस काम करतोय असं सांगितलं तर थोडी अतिशयोक्ती वाटेल. पण कोल्हापुरातल्या एका तरुणानं ही अतिशयोक्ती वास्तवात आणली आहे. उप्पल जितेंद्रकुमार शाह असं या तरुणाचं नाव आहे. आज ३७ वर्षांचा हा तरुण अनेक व्यवसायांत आघाडीच्या पदांवर कार्यरत आहे. राज्य, राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी या तरुणाला गौरवण्यात आलंय. वडिलोपार्जित साखरेच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन, तो आणखी पुढे कसा न्यावा, याचे उदाहरण म्हणून उप्पल शाह यांचं नाव घ्यायला हवं.
(Source: Sakal)