कोल्हापूर :

ई- बाय शुगरचे सीईओ उप्पल शाह आणि एमडी हेमंत शाह यांचा जागरण ग्रुप- रेडिओ सिटीतर्फे यंदाच्या ‘बिझनेस टायटन्स ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात आला. देशातील सर्वात मोठा ऑनलाईन साखर खरेदी-विक्री प्लॅटफॉर्म म्हणून ई-बाय शुगर डॉट कॉमची निवड केली होती. त्यामध्ये यंदा कोल्हापूरच्या शाह बंधूंची निवड करण्यात आली. अभिनेते सुनील शेट्टी, अभिनेत्री करिष्मा तन्ना, निम्रत कौर, कैनात अरोरा या बॉलिवूड स्टार्ससोबतच दुबईच्या राजघराण्यातील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत हा शानदार पुरस्कार सोहळा झाला.

Source: http://epunyanagari.com/articlepage.php?articleid=PNAGARI_VKR_20230618_04_2