कोल्हापूर, ता. २९ कारखानदारांना उत्पादित साखर एनसीडीईएक्सवर विक्री करून दराची हमी मिळवता येते. त्यापासून वायदेबाजारात साखरेची विक्री हा कारखानदारांना फायदा मिळविण्यास उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन जे.के. एन्टरप्रायजेसचे संचालक उप्पल शहा यांनी केले.जे.के. एन्टरप्रायजेस वायदेबाजारामधील जागरूकतेच्या कार्यशाळेत ते बोलत होते. रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यशाळेत श्री. शहा यांनी एनसीडीईएक्समधील व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग, साखरेची प्रत्यक्षात डिलिव्हरी कार्यपद्धती यांविषयी माहिती दिली.उत्पादनप्रमुख श्रीकांत अंबाटी यांनी साखर कॉन्ट्रक्टविषयी सविस्तर माहिती दिली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, पृथ्वीराज देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम कासार, इको केनचे यू. आर. के. राव यांनी मार्गदर्शन केले. या वेळी एन्टरप्रायजेसचे जीतुभाई शहा, महावीर गाटे, साखर व्यापारी संघाचे. अध्यक्ष विजयभाई शहा, अमितकुमार गाट, दत्त शिरोळ कारखान्याचे एम. डी. पाटील, वारणा कारखान्याचे एम. डी. श्री. चव्हाण, जवाहर कारखान्याचे श्री. जोशी, सुरेश देवयानी उपस्थित होते.